पुस्तक समीक्षा : गो किस द वर्ल्ड
लेखक : सुब्रतो बागची
सुब्रतो बागचि हे माईंड ट्री या कंपनीचे संस्थापक – सीईओ आणि यशस्वी लेखक आहेत, ओरिसा मधील छोट्याश्या गावातून सुरू झालेला त्यांचा प्रेरणादायी प्रवास तुम्हाला या पुस्तकातून घडेल.
प्रत्येक व्यक्ती ही आपल्या अनुभवातून, आई – वडिलांकडून आणि समाजाकडून सतत शिकत असते सुब्रतो सुद्धा त्यांच्या जीवनप्रवासात सतत याचा अनुभव घेत आले. त्यांचे वडील हे डिस्ट्रिक्ट एम्प्लॉयमेंट ऑफिसर म्हणून कोरपट ओरिसा येथे सरकारी नोकरीत होते. कोरपट हे असं छोटंसं गाव जिथे ना इलेक्ट्रिसिटी असायची ना नळांना पाणी आणि शाळेचा तर पत्ताच नाही त्यामुळे सुब्रतो चे बरचस शिक्षण हे घरीच होत होत.
सरकारी नोकरीत असल्यामुळे प्रत्येक वर्षी वडिलांची बदली होत असे त्यामुळे सरकार ने त्यांना वापरासाठी एक जीप दिली होती, ऑफिस मध्ये गॅरेज नसल्याने जीप नेहमी घरीच उभी असायची पण सुब्रतो चे वडील मूल्यांचे पक्के होते, ऑफिस कामाव्यतिरक्त ते कधीही या जीप ला हात लावायचे नाहीत, त्यांच्या परिवाराने कधीही या जीप मध्ये पाऊल ठेवले नव्हते आणि तशी सक्त ताकीद होती, यामधूनच सुब्रतो ना त्यांचा पहिला धडा मिळाला कधीही सरकारी संपत्तीचा आणि सेवांचा गैरवापर करू नये.
सुब्रतो आणि त्यांच्या भावांना जीप ड्रायवर ला नावाने / ड्रायव्हर म्हणून बोलविण्यास सक्त मनाई होती त्यांना आदराने ‘दादा’ म्हणूनच बोलावले जात असे. प्रत्येकाचा आदर करण्याचं मूल्य त्यांच्या वडिलांकडून त्यांना मिळालं आणि तेच त्यांनी त्यांच्या मुलीला शिकवलं.
तेव्हा रेडिओचा काळ होता आणि त्यांची जाहिरात ही जोरदार असायची त्यामुळे सुब्रतो आणि त्यांच्या ४ भावांना तो रेडिओ आपल्याही घरात असावा असं वाटायचं पण सुब्रतो चे वडील म्हणत असत की आपल्याला त्याची गरज नाही कारण आपल्या कडे आपली ५ मूल कोणत्या रेडिओ पेक्षा कमी नाहीत.
त्यांचं ठाम मत होत की आपलं यश आणि समाजातील स्थान हे आपल्या कडील वस्तूं नाहीत तर नीतिमूल्ये ठरवतात.
सुब्रतो च्या आईला घर सजवण्याची झाडे लावण्याची खूप आवड होती आणि ती ते खूप मन लावून करायची पण सरकारी घर असल्याने लोक विचारायची की काही वर्षात घर सोडायचं मग एवढा खटाटोप का ? तेव्हा आई म्हणायची “मला जे काही मिळालं ते त्यापेक्षा सुंदर बनवून पुढील लोकांना देणं माझं कर्तव्यच आहे”
सुब्रतो म्हणतात हे त्यांच्या यशाचं रहस्य आहे आपण जे काही करतो ते स्वतःसाठी नाही तर इतरांना काय देऊ शकतो या विचारानेच ते आजही करतात.
दुर्देवाने काही आजारामुळे सुब्रतो च्या आईची दृष्टी गेली त्यांना काहीच दिसत नसे एक दिवस सुब्रतो नी त्यांना विचारलं आई तुला तुझ्या आंधळ्या डोळ्यांनी काय दिसत तर त्या म्हणाल्या मला काळोख नाही तर प्रकाश दिसतो.
८० वर्षांच्या वयातही त्या आपली सर्व काम स्वतः करायची घर नीटनेटक आणि स्वच्छ ठेवायच्या त्या सुब्रतो ना म्हणायच्या आपल्याला यश म्हणजे डोळ्यांनी जग बघणं नव्हे तर तो न दिसणारा प्रकाश बघणे आहे सुब्रतो म्हणतात हा त्यांना मिळालेला सर्वात मोठा मंत्र होता.
अश्या बऱ्याच अनुभवातून आणि शिकवणीतून हे पुस्तक तुम्हाला घेऊन जातं.