सरकारचे डोके ठिकाणावर आले का ?

लोकसभा निवडणुका पूर्ण झाल्या आणि जनतेने हवेत उडणारे काही पंख छाटलेच, भाजपाने जरी निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकल्या असल्या तरी त्यांचे स्पष्ट बहुमत मात्र आले नाही ते ४०० पार वैगेरे तर दूर पण चांगले चांगले सोशल मीडिया आणि गोदी मीडियावर पुन्हा पुन्हा उजळले जाणारे दिवे मात्र जनतेने विझवलेच, मग ते स्मृती इराणी, राजीव चंद्रशेखर, अन्नमालाई, अधिररांजन अशी नावे खासदारांच्या यादीतून नाहीशी झाली (त्यांचं करियर कितीती दूर जाईल हे माहीत नाही).

आता जर आपण या विरोधकांचा आनंदोत्सव बघितला तर तुम्ही म्हणाल यांचं तर बहुमत देखील नाही, सरकार तर BJP च बनविणार अस असताना हे का नाचतायत ? एवढा आनंद साजरा का करत आहेत? नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होणार असले तरी विरोधक इतके खुश का आहेत ? २००४ च्या निवडणुकीशी या निवडणुकांची याची तुलना का केली जातेय? २००४ मध्ये तर BJP हरली आणि सत्ता बदलली पण आता तर तस काही नाही मग एवढं नाचायचं का ?

2004 मध्ये भाजपाचा पराभव झाला आणि यूपीए सरकार सत्तेवर आली. पण आता सत्ता बदलणार नाही हे स्पष्ट आहे मग हा आनंद का ?कारण भाजप या निवडणुकांमध्ये सर्व ताकदीने लढली भाजपाकडे मोठा निधी (तो इलेट्रोल बाँडचा का असेना), शक्ती (RSS सारखा संघ आणि भक्त) आणि प्रसारमाध्यमांचा (गोदी मीडिया) पाठिंबा होता. पण त्यांची कामगिरी मात्र अपेक्षेप्रमाणे झाली नाही.निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता कमी असल्याची टीका केली जाते, आयोगाने केलेला सावळा गोंधळ आणि त्यांना पडलेल्या शिव्या तुम्हाला माहीत असेलच शिवाय विरोधी पक्षनेते भाजपामध्ये सामील झाले किंवा त्यांच्या पक्षांचे विभाजन करण्यात आले महाराष्ट्रात धनुष्य तुटला आणि मशाल आली तर घडळयासोबत तुतारी वाजली पण जनतेने मात्र कोण खर कोण खोटं हे दाखवत कौल दिलाय. पहिल्या टप्प्यातच भाजपाला आपली स्थिती नाजूक असल्याची जाणीव झालीच असावी.

मोदी पंतप्रधान राहतील, पण अमित शहा यांची भूमिका काय असेल हे सांगता येत नाही कारण ही बहुमताची नाही तर तडजोडीची सरकार असेल आणि त्यामध्ये शहांचे संबंध मित्र पक्ष्यांशी किती उत्तम आहेत हे वेगळं सांगायला नको त्यामुळे हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
आता विरोधकांना जास्त बोलण्याची ताकद आहे. संसदेतील निलंबन नाट्य आणि वाट्टेल ते कायदे आणि बिल पास करून घेण्याची दादागिरी आता चालणार नाही. प्रसारमाध्यमे आणि न्यायव्यवस्था अधिक धैर्याने काम करतील अशी अपेक्षा आहेच, आता ही विकली गेलेली मीडिया लवकर सुधारेल की वेळ घेईल हे मात्र सांगता येणार नाही.न्यायमूर्तीही समाजाच्या प्रतिक्रिया पाहून निर्णय घेतात. त्यामुळे लोकशाहीच्या पुनर्स्थापनेची शक्यता आता वाटू लागली आहे, वातावरण बदलतंय हवा देखील बदलतेय. आपल्या दबलेल्या संस्था मग ती इडी असो किंवा पोलीस आता थोड्या मोकळ्या होतील आणि अधिकाऱ्यांना मोकळा श्वास घेता येईल अशी अपेक्षा.

राजकीय परिभाषा बदलणार हे मात्र या निवडणुकांनी ठणकावून सांगितलं आहे. भाजपा हिंदुत्वाच्या राजकारणाचा वापर करतेय, पण आता मतदारांनी याला पाठिंबा दिला नाही हे स्पष्ट आहे, आयोध्यामध्ये राममंदिर बांधलं पण तिथल्या लोकांच्या समस्या समजून घेण्यास मात्र भाजपा फोल ठरली, भारत आघाडीने विविध पक्षांना एकत्र आणले आणि उत्तर प्रदेश मध्ये दणदणीत विजय मिळवला. विविध समाज घटकांना एकत्र करून चळवळ उभी करणे आवश्यक होते आणि विरोधी पक्षांनी मिळून का होईना ते उत्तम रित्या केले.

भाजपाने मतदारांचा अपमान केला आणि त्याचा फटका बसला, मराठीमध्ये माज उतरला अस आपण म्हणू शकतो पण त्यामुळे सरकारच डोकं ठिकाणावर येईल अशी अपेक्षाच करता येईल, समाजवादी पार्टीने विविध समाज घटकांना एकत्र आणून भाजपाला पराभूत केले. यूपीमध्ये रेनबो कोलिशन यशस्वी ठरले हे विशेष.

महाराष्ट्रातही भाजपाचा अहंकार त्यांच्या पराभवाचे कारण ठरला. शरद पवार यांनी अजित पवार यांना पराभूत केले. द्रविड पक्षांनी भाजपाचा जोरदार विरोध केला आणि यश मिळवले, ठाकरे आवाज शिंदे दाबू शकले नाहीत उलट उलट्या हाताची चपराक गालावर (की दाढीवर) पडली.तमिळनाडूत भाजपाचे प्रयत्न निष्फळ ठरले. करुणानिधी आणि स्टालिन यांच्या नेतृत्त्वाखाली द्रविड पक्षांनी भाजपाला पराभूत केले. भाजपाचा अतिआत्मविश्वास इथे देखील त्यांच्यावर भारी पडला.अंततः, भाजपाच्या शहरी मतदारांचा पाठिंबा कायम आहे. पण ग्रामीण आणि सामाजिक न्यायाच्या मुद्द्यांवर विरोधकांनी चांगली कामगिरी केली. आगामी काळात याच मुद्द्यांवर लढाई होणार आहे हे मात्र नीच्छित आहे.

मोदींच्या जादू उतरते आणि परिणाम होतोय हे समोर आहे विरोधकांनी विविध समाज घटकांना एकत्र आणून भाजपा विरोधात यश मिळवले आहे. आता लोकशाही संतुलन पुनर्स्थापित होण्याची शक्यता दिसतेय. भाजपाला आपल्या धोरणांमध्ये बदल करावे लागतील आणि नवीन राजकीय स्थित्यंतरांना तोंड द्यावे लागेल, नाहीतर मोदी चेहरा मीडिया वर उजलेल पण पक्ष्याला मात्र नुकसान सहन करावे लागेल हे मात्र नक्की.

– एक मतदार

© 2024 आलिखित. कॉम – All Right Reserved.

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00