सोशल मीडियाचा भारतीय राजकारणावरील प्रभाव

Social Media Impact on Indian Politics

अलीकडेच द हिंदू मध्ये एक खूपच रंजक लेख वाचला, ज्यात सोशल मीडिया चा भारतीय राजकारणावर होणारा प्रभाव सांगितला होता. चला, यावर नजर टाकूया.

आजच्या काळात, ध्रुव राठी हे सर्वात यशस्वी यूट्यूबर आहेत, ज्यांनी राजकारणातही आपली महत्त्वाची भूमिका बनवली आहे. त्यांच्या व्हिडिओज ना केवळ मोठ्या प्रमाणात पाहिले जात नाही, तर त्यांनी निवडणुकांवरही प्रभाव टाकला हे लोकसभा निवडणुकांच्या निकालावरून आपल्या लक्ष्यात आलेच असेल. या लेखात आपण भारतीय राजकारणावर सोशल मीडिया चा प्रभाव कसा आहे याबद्दल चर्चा करूया.

उत्तर प्रदेश मधील एक तरुण मुस्लिम युवक म्हणतो की जर काँग्रेस जिंकली तर ते ध्रुव राठी मुळेच असेल. तसेच, आग्र्यातील एक तरुण जाट म्हणतो की ध्रुव राठी सध्या सर्वात प्रभावी ऑनलाइन व्यक्तिमत्त्व आहेत. इथपर्यंत की भारतीय जनता पक्षाचा एक तरुण समर्थकही रवीश कुमार ला ऐकतो, विरोधी विचार असले तरी भाजप आणि इतर पक्ष्याचे कार्यकर्ते देखील कळत नकळत अश्या सोशल मीडिया इन्फ्ल्यून्सर चे व्हिडिओज बघतात.

हे स्पष्ट आहे की हे यूट्यूबर्स आणि सोशल मीडिया इन्फ्लुएंसर्स मोठ्या प्रमाणात लोकांना प्रभावित करत आहेत. जेव्हा देशात मतदारांची टक्केवारी ५०-६० टक्क्यांच्या आसपास असते, तेव्हा सोशल मीडिया चा व्यापक प्रभाव नाकारता येत नाही, कारण तुम्ही बघितले असेल की धृवच्या डीक्टेटर्शिप हा व्हिडिओ ३५ मिलियन लोकांपर्यंत पोहोचतो.

सोशल मीडिया ने भारतीय राजकारणात एक नवीन क्रांती घडवून आणली आहे. ध्रुव राठी असो किंवा रवीश कुमार, हे सर्व इन्फ्लुएंसर्स त्यांच्या विचारांनी लाखो लोकांना प्रभावित करत आहेत. यात काही शंका नाही की सोशल मीडिया चा प्रभाव वाढत आहे, आणि हा एक सकारात्मक बदल आहे.

आम्ही पाहत आहोत की जसजसा काळ पुढे जातो, तसतसे राजकीय नेते आणि पक्षही सोशल मीडिया वर सक्रिय होत आहेत. योगी आदित्यनाथ पासून इतर प्रमुख नेते देखील, सोशल मीडिया वर आपली पकड मजबूत करत आहेत. आजकाल प्रत्येकाच्या हातात फोन आहे आणि लोक डिजिटल मीडियावर जास्त विश्वास ठेवत आहेत.

कारण असे आहे की सोशल मीडिया तुम्हाला प्रत्येक पक्षाची माहिती मिळविण्याची स्वातंत्र्य देतो. तुम्ही काँग्रेस चे समर्थक असो किंवा भाजप चे, तुम्ही तुमच्या आवडीची माहिती मिळवू शकता. म्हणूनच मोठे मोठे न्यूज चॅनल्स देखील सोशल मीडिया वर सक्रिय झाले आहेत.

आम्ही आकडेवारीची चर्चा करतो तेव्हा, एप्रिल मध्येच ध्रुव राठी ने जवळपास अडीच मिलियन सब्सक्राइबर आणि व्यूज मिळवले. रवीश कुमार आणि अभिसार शर्मा यांचीही व्यूअरशिप खूप वाढली आहे. हे दाखवते की सोशल मीडिया चा प्रभाव किती व्यापक आहे.

प्रत्येक पक्ष त्यांच्या रणनीतीत सोशल मीडिया चा वापर करत आहे, आणि हे समजणे महत्त्वाचे आहे की सोशल मीडिया ने भारतीय राजकारण कसे बदलले आहे. जिथे आधी पारंपरिक मीडिया चे वर्चस्व होते, आता सोशल मीडिया ने त्याची जागा घेतली आहे.

शेवटी, सोशल मीडिया भारतीय राजकारणाला नवीन दिशा देत आहे. हे एक मंच आहे जिथे लोक उघडपणे आपले विचार मांडू शकतात आणि सत्य बाहेर आणू शकतात. म्हणून, मत देणं विसरू नका आणि सोशल मीडिया चा योग्य वापर करा.

सोशल मीडिया च्या फायद्यांमध्ये लोकशाही वाढवणे, विविध विचारांवर चर्चा घडवून आणणे, आणि प्रत्येकाला आपले मत मांडण्यासाठी व्यासपीठ देणे हे सामील आहे. तसेच, डिजिटल माध्यमांच्या वापरामुळे अनेकांपर्यंत पोहोचणे सोपे झाले आहे.

हे ध्यानात घेऊन, आपल्याला हे देखील माहित असले पाहिजे की सोशल मीडिया च्या उपयोगाचे नियम आणि त्याच्या मर्यादा देखील आहेत. योग्य माहिती मिळवणे, फेक न्यूज पासून सावध राहणे, आणि संयमाने सोशल मीडिया वापरणे हे आपल्याला शिकायला हवे.

आशा करतो की हा लेख तुम्हाला आवडला असेल. तुमचे विचार कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि मत नक्की द्या. हे तुमचे अधिकार आणि कर्तव्य दोन्ही आहेत. धन्यवाद!

Related posts

मोदींच्या लोकप्रियतेत घट ?

BJP ची विलक्षण मार्केटिंग रणनीती

सरकारचे डोके ठिकाणावर आले का ?